Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ५०

मनाचे श्लोक - श्लोक ५० - [Manache Shlok - Shlok 50] नसे अंतरी काम नानाविकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी.

मनाचे श्लोक - श्लोक ५० | Manache Shlok - Shlok 50

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५०, नसे अंतरी काम नानाविकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी

मनाचे श्लोक - श्लोक ५०


नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विकारा न कामादयो यस्य चित्ते
तपस्वी विरागी स्वयं ब्रह्मचारी ।
सदा शान्तचित्तस्तमोलेशहीनः
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ५० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ५० - अर्थ


काम उत्पन्न करणारा. ज्याच्या अंतःकरणात काम किंवा इतर विकार नसतो, किंवा ज्याची वृत्ति कामकार नसते. श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -

स्वरूपीं भरतां कल्पना ।
तेथें कैंची उरेल कामना ।
म्हणौनियां साधु जना ।
कामचि नाहीं ॥

विषयावरील ज्याचे प्रेम गेले आहे असा वीतरागी, आसारहित, निराश. दासबोधात म्हटलंय -

आशा धरितां परमार्थाची ।
दुराशा तुटली स्वर्थाची ।
म्हणोन नैराशता साधूची ।
वोळखण ॥

जो निःसंदेह झाला, तम म्हणजे अज्ञान समूळ नाहीसे होऊन संशयरहित ज्ञानाने ज्याचे समाधान झाले.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची