Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ४९

मनाचे श्लोक - श्लोक ४९ - [Manache Shlok - Shlok 49] सदा बोलण्यासारिखे चालताहे, अनेकीं सदा एक देवासि पाहे.

मनाचे श्लोक - श्लोक ४९ | Manache Shlok - Shlok 49

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४९, सदा बोलण्यासारिखे चालताहे, अनेकीं सदा एक देवासि पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ४९


सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा वक्ति यद् याति मार्गेण तेन
प्रपश्यत्यनेकेषु तो देवमेकम् ।
भ्रमस्य क्षयाद् यो भजेद्वासुदेवं
स धन्योऽस्ति दासोऽत्र सर्वोत्तमस्य ॥ ४९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ४९ - अर्थ


श्रीसमर्थांनी हा उपदेश दासबोधात व इतरत्र अनेक ठिकाणी केलेला आहे. महंतांच्या ठिकाणी जो गुण असायला पाहिजे त्यात हा श्रेष्ठ गुणांपैकी एक आहे. दासबोधात समर्थ सांगतात -

जैसे बोलणें बोलावें ।
तैसेंची चालणें चालावे ।
मग मंहतलीळा स्वभावें ।
आंगी बाणे ॥

देव सदोदित संचला ।
लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध जाला ।
हें तों घडेना ॥

तो येकलाचि सकळां घटीं ।
करी भिन्नभिन्न राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी ।
किती म्हणौन सांगावी ॥

इतुके ठाईं पुरवला ।
अनेकीं येक चि वर्तला ॥

सांडील सगुण भजनासी ।
तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणोनि यां सगुणभजनासी ।
सांडूच नये ॥

निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें ।
भ्रमरूप ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची