Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १६८

मनाचे श्लोक - श्लोक १६८ - [Manache Shlok - Shlok 168] करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा.

मनाचे श्लोक - श्लोक १६८ | Manache Shlok - Shlok 168

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६८, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा

मनाचे श्लोक - श्लोक १६८


करी वृत्ती जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते ।
परी सज्जना केविं बाधु शके ते ॥ १६८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रशान्तां करोत्यात्मवृत्तिं स साधुः
दुराशाश्रयाद् दीनतां नोपयाति ।
उपाधिर्हि देहात्म-धी-वृद्धि-कर्त्री
कथं सा प्रबाधेत साधुं विरागम् ॥ १६८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६८ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, जो मनोवृत्ती स्थिर करतो, म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत यांचा निवाडा करून जो शाश्वत स्वरूपी आपली वृत्ती लीन करतो, तो संत जाणावा.

जो जाणेल भगवंत ।
तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत ।
निवाडा करी ॥

दुराशा म्हणजे दुष्ट आशा, प्रपंचादिकाची स्वार्थपर आशा. दैन्याला कारण स्वार्थाची आशा होय. तो स्वार्थच नसला तर दैन्य कोठून येणार ?

आशा धरितां परमार्थाची ।
दुराशा तुटली स्वर्थाची ।
म्हणोन नैराशता साधूची ।
वोळखण ॥

सिद्धदशा प्राप्त होण्यापूर्वी उपाधीत पडल्यास देहबुद्धी वाढत जाते, परंतु सिद्धदशा एकदा अंगी बाणल्यावर उपाधी काय करणार?

स्थिति बाणतां स्वरूपाची ।
चिंता सोडिली देहाची ।
याकारणें होणाराची ।
चिंता नसे ॥

स्वरूपीं लागतां बुद्धी ।
तुटे अवघी उपाधी ।
याकारणें निरोपाधी ।
साधू जन ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची