Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक ७४

मनाचे श्लोक - श्लोक ७४ - [Manache Shlok - Shlok 74] बहुतांपरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची.

मनाचे श्लोक - श्लोक ७४ | Manache Shlok - Shlok 74

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ७४, बहुतांपरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची

मनाचे श्लोक - श्लोक ७४


बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


तपःपूर्वके साधने देहकष्टं
धनेनैव दानं व्रतोद्यापनं च ।
कृपालुः सदा दीनजीवेषु योऽसौ
प्रभाते हृदा राघवश्चिन्तनीयः ॥ ७४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ७४ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करवून देत आहेत की, तीर्थयात्रादि इतर साधने सोपी नाहीत. त्यावेळी काशी यात्रा दुर्घट होती. आज ती दुर्घटता काशीयात्रेत नसली तर मानससरोवर दर्शनात आहे. त्यात नसली तर पलीकडच्या यात्रेत आहे. तसे व्रते, उद्यापने किंवा दानधर्म करणे ही पैशांची कामे आहेत. ती निर्धनाच्या हातून होणार नाहीत. ज्यात श्रम नाहीत, साहस नाही, द्रव्यादिकांची अपेक्षा नाही, असे सर्वांना सुलभ वाटणारे परमार्थाचे साधन म्हटले म्हणजे दीन दयाळ प्रभु श्रीरामचंद्र यांचे अखंड नामस्मरण होय.

यासी नचले कांही विघ्न ।
कोण्ही हि न करूं शके भग्न ।
म्हणौनि नारदादि सर्वज्ञ ।
परी नामींच रमोनि राहिले ॥

पण हे साधन खरोखरच का इतके सोपे आहे आणि ते जर का इतके सोपे आहे, तर त्याचा आश्रय करून सर्व जीव आपला उद्धार का करून घेत नाहीत ? साधन सोपे आहे याचा अर्थ त्यात कष्ट नाहीत इतकेच, परंतु ते घोर तपश्चर्या व निष्ठा यावाचून कोणास साधत नाही. चारी अवस्थात अखंड नामस्मरण होणे काय सोपे आहे? एक तरी अवघड यात्रा करवतील व व्रतादिकांसाठी शरीर कष्टवून वित्तोपार्जन करून उद्यापने ही होतील, पण अखंड नामस्मरण होणार नाही! श्रीसमर्थांचे वडील बंधू तर म्हणतात,

सुलभ व्रत तप दान दमन ।
सुलभ तीर्थाटण वेदाध्ययन ।
सुलभ यज्ञ व्याकरणाभ्यासन ।
हरिभक्ति अति दुर्लभा ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची