न्याहारीसाठी कुरकुरीत, खमंग आणि झटपट होणारे पनीर टोस्ट सॅंडविच
पनीर टोस्ट सॅंडविच
पनीर टोस्ट सॅंडविच करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ६ ब्रेड स्लाईसेस
- १ कांदा (उभे पातळ काप)
- १ सिमला मिरची (उभे पातळ काप)
- १ चमचा चाट मसाला
- ३ चमचे हिरवी चटणी
- ७५ ग्रॅम पनीर (लहान चौकोनी तुकडे)
- १ चमचा बटर
- अर्धा चमचा जीरेपूड
- २ - ३ चमचे टोमॅटो केचअप
- चविनुसार मीठ
पनीर टोस्ट सॅंडविच करण्याची पाककृती
- एका वाडग्यात टोमॅटो केचअप, जीरेपूड आणि किंचीतसे मीठ घालून मिक्स करावे.
- तयार मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून १० मिनीटे मॅरिनेट करावेत.
- १० मिनिटाने पनीरचे तुकडे ग्रील करावेत. जर ग्रील नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये कमी बटरवर किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडे परतून घ्यावे.
- ग्रील केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे.
- ब्रेड स्लाइसेसवर बटर लावून घ्यावे.
- मंद आचेवर ब्रेड थोडे भाजून घ्यावेत.
- आता ३ ब्रेड स्लाईसेस घ्यावेत. त्यावर हिरवी चटणी लावून घ्यावी.
- त्यावर पनीरचे तुकडे, कांदा, सिमला मिरचीचे काप ठेवावेत. थोडासा चाट मसाला भुरभुरावा.
- आता उरलेल्या ३ ब्रेड स्लाईसेस वर हिरवी चटणी लावावी आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सॅंडविच तयार करावे.
- सॅंडविच ग्रील करुन घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर लावून दोन्ही बाजूने मध्यम आचेवर टोस्ट करून घ्यावीत.
- तयार आहे पनीर टोस्ट सॅंडविच.
- पनीर टोस्ट सॅंडविच हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचअप सोबत खाण्यास द्यावे.
पनीर टोस्ट सॅंडविच
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला