दक्षीण भारतातील प्रसिद्ध पेपर रस्सम बनविण्याची पारंपारीक पद्धत
पेपर रस्सम
पेपर रस्सम करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ टीस्पून तेल
- १/४ टीस्पून हिंग
- पाव टीस्पून हळद
- ४ - ५ कडीपत्ता पाने
- २- ३ टीस्पून कोथिंबीर
- १ लहान टोमॅटो बारीक चिरुन
- ३ - ४ लसूण पाकळ्या
- २ ते ३ टीस्पून चिंचेचा कोळ
- १ टेबलस्पून शिजवलेले तुरीचे वरण
- चवीनुसार मीठ
रस्सम मसाला पावडर बनविण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ टीस्पून धणे
- १/२ टीस्पून काळी मिरी
- १/२ टीस्पून जीरे
- २ - ३ सुक्या लाल मिरच्या
पेपर रस्सम करण्याची पाककृती
- सर्वात आधी धणे, जीरे, काळी मिरी आणि लाल मिरच्या वेगवेगळे कोरडेच हलके भाजावे
- मसाले गार झाले की त्यांची मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यावी.
- तयार आहे रस्सम मसाला पावडर.
- आता पातेल्यात तेल गरम करावे.
- तेलामध्ये हिंग, हळद, लसूण आणि कडिपत्ता घालून परतावे.
- १ चमचा रस्सम पावडर घालावी. १५ ते २० सेकंद परतावी.
- बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावे. नंतर २ कप गरम पाणी घालावे.
- वरण आणि चवीनुसार चिंचेचा कोळ घालावा. त्यानुसार मीठ घालावे.
- मंद आचेवर उकळी काढावी.
- तयार पेपर रस्सम गरम गरम प्यावे किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे.
पेपर रस्सम
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला