टोमॅटो बीट राईस - पाककृती

टोमॅटो बीट राईस, पाककला - [Tomato Beet Rice, Recipe] चवी सोबतच आरोग्यदायक असा टोमॅटो बीट राईस बनविण्याची सोपी पद्धत.
टोमॅटो बीट राईस - पाककृती | Tomato Beet Rice - Recipe

चवी सोबतच आरोग्यदायक असा टोमॅटो बीट राईस बनविण्याची सोपी पद्धत


टोमॅटो बीट राईसटोमॅटो बीट राईस करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २ वाट्या बासमती तांदूळ
 • ३ ते ४ लाल मोठे टोमॅटो
 • दीड चमचा हिरव्या मिरच्या
 • लसूण
 • वाटलेले आले
 • चवीनुसार मीठ
 • १ चमचा साखर
 • १ वाटी नारळ चव
 • कोथिंबीर
 • २ चमचे तूप
 • १ छोटा तुकडा बीट (याने भाताला छान रंग येतो)
 • १ चमचा जीरे

टोमॅटो बीट राईस करण्याची पाककृती


 • तांदूळ चाळणीत घालून नळाखाली दोन मिनिटे धरून निथळावे.
 • पूर्ण स्टार्च निघून भात मोकळा होतो.
 • टोमॅटो व बीट उकडून रस काढावा.
 • साधारण साडेतीन वाट्या रस पाणी घालून करावा.
 • नारळ चव थोड्या पाण्यात वाटून घ्यावा.
 • तुपात जीरे घालून मिरची + लसूण + आल्याची पेस्ट परतावी.
 • त्यात तांदूळ परतावे.
 • टोमॅटो रस घालावा.
 • मीठ घालावे.
 • अर्धवट शिजल्यावर नारळ चव घालावा.
 • साखर घालावी.
 • खाली तवा ठेवूनवर भाताचे पातेल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ आणावी.
 • गरम गरम कोथिंबीर घालून वाढावे.
 • टोमॅटो राईस पापड, रायत्यासोबत खायला छान लागतो.

टोमॅटो बीट राईस

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.