पावभाजी पराठा - पाककृती

पावभाजी पराठा, पाककला - [Pavbhaji Paratha, Recipe] शिल्लक पावभाजीचा खमंग पराठा बनविण्याची सोपी पद्धत.
पावभाजी पराठा - पाककृती | Pavbhaji Parath - Recipe

शिल्लक पावभाजीचा खमंग पराठा बनविण्याची सोपी पद्धत


पावभाजी पराठापावभाजी पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • अर्धा कप पावभाजी (उरलेली)
 • अर्धा कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त होऊ शकते)
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ

पावभाजी पराठा करण्याची पाककृती


 • पावभाजी हाताने थोडी कुस्करून घ्या.
 • पावभाजीत पीठ, लाल तिखट आणि मीठ घाला.
 • पाणी अजिबात घालू नये.
 • जेवढं मावेल तितकेच पीठ घालायचे आहे आणि मळून गोळा तयार करावा.
 • तयार पीठाचे लिंबाएवढे मोठे गोळे करून त्याचे पराठे लाटावेत.
 • गरम तेलावर दोन्ही बाजूने तेल किंवा बटर लावून शेकून घ्यावेत.
 • पराठा खरपूस भाजून घ्यावा.
 • पराठ्यावर चीझ टाकून सर्व्ह करावा.

टीप: लहान मुलांना देताना लाल तिखट टाकू नये.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.