दिवाळ सणासाठी खास अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या पाकातील करंज्या
पाकातील करंज्या
पाकातील करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दीड वाटी मैदा
- पाऊण वाटी रवा
- ४ टे. चमचा पातळ डालडाचे मोहन
- पाव चमचा मीथ व थोडे दूध
सारण करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ लहान बाटली गुलकंद
- १ वाटी ओले खोबरे
- ३-४ खारका
- १ टे. चमचा बेदाणा
- २ टे. चमचा काजू तुकडा
- २ टे. चमचा खडीसाखरेचा चुरा
पाक करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या साखर
पाकातील करंज्या करण्याची पाककृती
- रवा, मैदा, मीठ व तुपाचे मोहन एकत्र करून दुधात पीठ भिजवा.
- दोन तासांनी कुटून घ्या.
- ओले खोबरे परतून घ्या व गुलकंदात मिसळा.
- खारका व काजू ह्यांचे बारीक तुकडे करा.
- नंतर सारणासाठी सांगितलेल्या सर्व वस्तू एकत्र करा.
- पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
- त्यात वरील सारण थोडेसे भरा.
- नंतर नेहमीप्रमाणे दुमडून करंज्या कातून घ्याव्या व तळून घ्याव्या.
- साखरेचा दोनतारी पाक करावा.
- तललेल्या करंज्या पाकात टाकाव्या.
पाकातील करंज्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला