पाकातल्या करंज्या
पाकातल्या करंज्या
पाकातल्या करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- बारीक रवा १ वाटी
- मैदा १ वाटी
- मीठ
- बेकिंग पावडर १/४ टेबल स्पून
- तेल २ टेबल स्पून (कडकडीत; मोहन म्हणून वापरण्यासाठी)
- दूध (पीठ भिजवण्यासाठी)
- तूप
सारण करण्यासाठी लागणारा जिन्नस
- काजू, बदाम, पिस्ते कूट १/२ वाटी
- खवा १/२ वाटी
- तूप १ टेबल स्पून
- वेलची पूड
पाक करण्यासाठी लागणारा जिन्नस
- साखर २ वाट्या
- पाणी १ वाटी
- केशर सिरप
- वर्ख
पाकातल्या करंज्या करण्याची पाककृती
- रवा, मैदा, मीठ, बे. पावडर घालून एकत्र करावा.
- मोहन चोळून दुधाचे घट्ट भिजवून कुटावा किंवा मळावा.
- छोट्या लाट्या करून तासभर झाकाव्या.
- खवा तुपावर परतून ड्रायफ्रूटची पूड घालावी.
- वेलची पूड घालून एकत्र करावे.
- साखरेत पाणी घालून तीन तारी पाक करावा.
- केशर सिरप घालावे.
- प्रत्येक लाटीच्या पुऱ्या लाटून थोडे थोडे सारण भरावे.
- घट्ट बंद करून मुरड घालावी किंवा कातून मंद गॅसवर करंज्या तळाव्या.
- लगेच पाकात घालून उलटसुलट फिरवून प्लेटमध्ये ठेवाव्या.
- वरून वर्ख लावावा.
- आपल्या आवडीनुसार गाजर हलवा, शिरा इ. सारण भरता येते.
- पाकात न घालता सारण गोड करावे.
पाकातल्या करंज्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला