चणा डाळीच्या तिखट करंज्या - पाककृती

चणा डाळीच्या तिखट करंज्या, पाककला - [Harbhara Dalichya Tikhat Karanjya, Recipe] दिवाळी फराळातील एक खमंग आणि खुसखुशीत पदार्थ चणा डाळीच्या तिखट करंज्या.
चणा डाळीच्या तिखट करंज्या - पाककृती | Harbhara Dalichya Tikhat Karanjya - Recipe

खमंग आणि खुसखुशीत चणा डाळीच्या तिखट करंज्या


चणा डाळीच्या तिखट करंज्या - (Harbhara Dalichya Tikhat Karanjya Recipe) दिवाळी फराळातील एक खमंग आणि खुसखुशीत पदार्थ चणा डाळीच्या तिखट करंज्या बनविण्याची सोपी पद्धत.चणा डाळीच्या तिखट करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १०० ग्रॅम चणा डाळ
 • १ वाटी किसलेले सुके खोबरे
 • २ वाटी मैदा
 • अर्धा वाटी रवा
 • ४ - ५ हिरव्या मिरच्या
 • १ इंच आले
 • ७ - ८ लसूण पाकळ्या
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • चवीनुसार तिखट
 • चिरलेली कोथिंबीर
 • तळण्यासाठी तेल

चणा डाळीच्या तिखट करंज्या करण्याची पाककृती


 • चणा डाळ ४ तास पाण्यात भिजवत ठेवावी.
 • डाळ भिजवल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे.
 • मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ, मिरच्या, आले, लसूण, मीठ, हळद आणि तिखट घालून जाडसर वाटावे.
 • कढईत थोडेसे तेल घेऊन जीरेची फोडणी करावी आणि त्यात वाटलेले मिश्रण घालून परतावे.
 • वाफ येऊ द्यावी आणि त्यात खोबरे, कोथिंबीर घालून मिश्रण ढवळून घ्यावे.
 • आता गॅस बंद करून सारण थंड होऊ द्यावे.
 • आता मैदा व रवा परातीत घेऊन त्यात तेलाचे मोहन, थोडे मीठ व किंचित हळद घालून कणिक थोडेसे घट्टसर मळावे.
 • कणकेच्या लहान पुर्‍या लाटून त्यात तयार सारण भरून करंजीच्या साच्यात भराव्यात किंवा करंज्या बनवाव्यात.
 • कढईत तेल टाकून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

चणा डाळीच्या तिखट करंज्या

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.