भाजक्या पोह्यांचा चिवडा - पाककृती

भाजक्या पोह्यांचा चिवडा, पाककला - [Bhajakya Pohyancha Chivda, Recipe] दिवाळ फराळातील सर्वात आवडीने खाल्ला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा.
भाजक्या पोह्यांचा चिवडा - पाककृती | Bhajakya Pohyancha Chivda - Recipe

दिवाळ फराळातील सर्वात आवडीने खाल्ला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा


भाजक्या पोह्यांचा चिवड्याची पाककृती - (Bhajakya Pohyancha Chivda Recipe) दिवाळ फराळातील सर्वात आवडीने खाल्ला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा.भाजक्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २५० ग्रॅम भाजके पोहे
 • अर्धा वाटी तेल
 • पाव कप शेंगदाणे
 • १ चमचा बडीशेप
 • १० - १२ कडिपत्त्याची पाने
 • पाव कप खोबर्‍याचे काप
 • १ चमचा मोहरी
 • चिमुटभर हिंग
 • १ चमचा तिखट
 • पाव चमचा हळद
 • १ ते २ चमचे चिवडा मसाला
 • १ चमचा पिठीसाखर

भाजक्या पोह्यांचा चिवडा करण्याची पाककृती


 • प्रथम भाजके पोहे निवडून घ्या आणि मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या.
 • आता कढईत तेल घालून शेंगदाणे, खोबर्‍याचे काप एक एक करून सोनेरी रंगावर तळून भाजक्या पोह्यांवर घाला.
 • नंतर उरलेल्या तेलात कढीपत्ता घालून कुरकुरीत तळून घ्या.
 • कढीपत्ता काढून घ्या व तेलात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि चिवडा मसाला घालून परतून घ्या.
 • आता हे सर्व भाजक्या पोह्यांवर टाका.
 • चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 • तयार झालेला चिवड्यामध्ये पिठीसाखर घालून मंद गॅसवर पुन्हा ३ ते ४ मिनीटे चांगला परतून घ्या.
 • तयार आहे खमंग, चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा.

दिवाळ फराळातील सर्वात आवडता भाजक्या पोह्यांचा चिवडा.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.