बदामाच्या चॉकलेट्सची लज्जतदार पाककृती
बदामाचे चॉकलेटची पाककृती - (Badamache Chocolate Recipe).
बदामाचे चॉकलेट करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १०० ग्रॅम चॉकलेट
- १ कप भाजलेल्या बदामाचे काप
- चॉकलेट बनविण्याचा साचा
बदामाचे चॉकलेट करण्याची पाककृती
- एका पातेल्यात पाणी अर्धे भरून गॅसवर ठेवा.
- दुसर्या भांड्यात चॉकलेटचे तुकडे टाकून पाणी भरलेल्या भांड्यात ठेवा.
- चमच्याने चॉकलेट ढवळत रहा, चॉकलेट वितळू लागेल.
- आता चॉकलेटचा साचा घ्या आणि त्यात वितळलेले चॉकलेट अर्धे भरा.
- त्यात थोडे बदामाचे काप टाका, त्यानंतर पुन्हा वरती चॉकलेटचा थर ओता.
- अश्याप्रकारे सर्व साचा पुर्ण भरुन घ्या.
- तयार साचा साधारण १ तास फ्रीजमध्ये ठेवा.
- नंतर साच्यातून सर्व चॉकलेट बाहेर काढून सोनेरी किंवा चंदेरी रॅपिंग पेपरमध्ये गुंडाळा.
- तयार आहेत बदामाचे चॉकलेट.
दिवाळीत किंवा इतर कार्यक्रमामध्ये बदामाचे चॉकलेट छानसे गिफ्ट रॅप करून देऊ शकता.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला