शिंगाडा पीठ, राजगिरा, खारकांची अस्सल महाराष्ट्रीय उपवासाची खीर
उपवासाची खीर: (Upavasachi Kheer Recipe)
उपवासाची खीर करण्यासाठी लागणारा जिन्नस
- २ चमचे शिंगाडा पीठ
- २ चमचे राजगिरा लाही
- २ चमचे खारीक पूड
- १ चमचा अळीव
- १ चमचा बदाम पूड
- १ चमचा पिस्ता पूड
- अर्धा चमचा वेलची पूड
- ५ चमचे साखर
- २ कप पाणी
- २ कप दूध
उपवासाची खीर करण्याची पाककृती
- एका भांड्यात शिंगाडा पीठ, राजगिरा, अळीव, खारीक पूड १ कप पाण्यात १० मिनीटे भिजवावे.
- आता हे भांडे गॅसवर ठेवावे.
- आता त्यात १ कप पाणी, २ कप दूध आणि साखर घालावी.
- हे मिश्रण सतत हलवून शिजवावे.
- गुठळी होऊ देऊ नये.
- ३ ते ४ मिनीटे खीर उकळल्यावर खाली उतरवावे आणि त्यात बदाम व पिस्ता पूड घालावी व ढवळावे.
- तयार आहे उपवासाची खीर.
उपवासात खाल्ली जाणारी ही खीर पचायला हलकी, शक्तीदायक आहे. उपवासासोबतच इतरवेळी देखील ही खीर केली जाऊ शकते.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला
- [col]