Loading ...
/* Dont copy */

मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती)

मिक्स व्हेज फ्रँकी, पाककृती - [Mix Veg Fankie, Recipe] झटपट होणारा आणि खासकरून मुलांना आवडणारा, शाळेत डब्याला देण्यासाठी मिक्स व्हेज फ्रँकी.

मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती)

झटपट बनणारा आणि मुलांना आवडणारा पदार्थ मिक्स व्हेज फ्रँकी


मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती)

(Mix Veg Fankie Recipe) रोज रोज डब्याला काय द्यावे हा आयांना पडलेल्या प्रश्नावर मिक्स व्हेज फ्रँकी हा चांगला पर्याय आहे. मिक्स व्हेज फ्रँकी हा झटपट बनवता येतो आणि मुलांना तो जास्त आवडतो. तसेच न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत मिक्स व्हेज फ्रँकी खाल्ला जाऊ शकतो.

Mix Veg Fankie is can be a good breakfast as well as in a tiffin for children. It is most favourite food of Children.



मिक्स व्हेज फ्रँकी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी भाज्या (फरसबी, गाजर, कोबी, हिरवा वाटाणा किंवा तुमच्या आवडीनुसार)
  • अर्धा चमचा मिरी पूड
  • अर्धा चमचा चाट मसाला
  • अर्धा चमचा लिंबू रस
  • अर्धा चमचा साखर
  • पाव चमचा तिखट
  • २ चमचे बारीक चिरलेला कांदा
  • २ चमचे किसलेले बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ चमचे बटर
  • २ चमचे किसलेले चीझ
  • २ तयार पोळ्या
  • १ चमचा टोमॅटो सॉस
  • १ चमचा बारीक लसूण
  • २ चमचे तेल
  • १ चमचा बारीक आलं
  • चवीनुसार मीठ

मिक्स व्हेज फ्रँकी करण्याची पाककृती


  • प्रथम हिरव्या वाटाण्यासहित सर्व भाज्या अर्धवट वाफवून घ्याव्यात.
  • शिजल्यावर उपसून ठेवाव्यात.
  • एका कढईत तेल घेऊन त्यात १ चमचा बारीक चिरलेले आलं व १ चमचा बारीक चिरलेला लसूण टाका.
  • व्यवस्थित परतून घ्या.
  • परतल्यावर त्यामध्ये बारीक कांदा टाकून थोडे परतून घ्या.
  • कांदा परतल्यावर वाफवलेल्या भाज्या टाका.
  • भाज्या व्यवस्थित मिक्स करा.
  • आता यामध्ये मिरी पूड, चाट मसाला, साखर, तिखट, मीठ, सॉस टाकून मोठ्या आचेवर २ मिनीटे भाज्या परतून घ्या.
  • भाज्या थोड्या अर्धकच्च्याच शिजवा.
  • थोड्या शिजल्यावर त्यावर लिंबाचा रस व कोथींबीर घालून गॅस बंद करा.
  • तयार मिक्स व्हेज बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवा.

फ्रँकी करण्याची पाककृती


  • एका ताटलीत तयार पोळ्या घ्या.
  • पोळीवर एका बाजूला साधारण १ ते २ चमचे सारण भरून गोल दुमडून थोड्याश्या बटरवर भाजून घ्या.
  • तयार फ्रँकीवर किसलेले चीझ टाकून मुलांना टेस्टी मिक्स व्हेज फ्रँकी सॉससोबत डब्यात द्या.

मिक्स व्हेज फ्रँकी (पाककृती) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची