पौष्टिक सोया ग्रॅन्युल्स पराठा
पौष्टिक सोया ग्रॅन्युल्स पराठा
पराठ्याचे कव्हर करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या कणिक
- १ वाटी मैदा
- १/४ वाटी तेल
- चवीनुसार मीठ
- १ चमचा जीरे
पराठ्याचे सारण करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ वाटी सोया ग्रॅन्युल्स १ तास भिजवून पिळून वाफवलेले
- १/४ वाटी चिरून कांदा
- २ चमचे लसूण, आलं व मिरची पेस्ट
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- ३ - ४ चमचे ब्रेड क्रम्स (बाईंडींगसाठी)
- १/२ वाटी किसून लाल टोमॅटो
- तूप किंवा तेल
पौष्टिक सोया ग्रॅन्युल्स पराठा करण्याची पाककृती
- परातीत कणिक, मैदा, थोडे जीरे, थोडे मीठ व तेल घालून कणिक भिजवावी.
- थोड्या तेलावर कांदा परतून आलं - लसूण - मिरची पेस्ट, किसलेला टोमॅटो घालून छान परतावे.
- आता त्यामध्ये सोया ग्रॅन्युल्सचे बारीक तुकडे व चवीनुसार मीठ घालून एखादे मिनीट वाफवून घ्यावे.
- गॅसवरून उतरवून लागेल तसे ब्रेड क्रम्स घालून सारण घट्ट करावे.
- सारण तयार आहे.
- आता भिजलेल्या कणकेचे मोठे गोळे करून त्याची पुरी लाटावी.
- पुरीमध्ये थोडे सारण भरून पराठे लाटून घ्यावेत व दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यावेत.
- बटर लावून चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करावेत.
पौष्टिक सोया ग्रॅन्युल्स पराठा
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला