तिखट चटपटीत आणि झणझणीत अशी कांद्याची चटणी
कांद्याची चटणी
कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ मोठा कांदा
- ३ लाल सुक्या मिरच्या
- अर्धा चमचा उडीदडाळ
- अर्धा चमचा चणाडाळ
- पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
- अर्धा चमचा जीरे
- ३ चमचे तेल
- १ चमचा चिंचेचा कोळ
- थोडे पाणी
- चवीनुसार मीठ
कांद्याची चटणी करण्याची पाककृती
- कढईत तेल गरम करून त्यात उडीदडाळ आणि चणाडाळ खमंग परतून घ्यावी.
- डाळी भाजल्यावर काढून घ्याव्यात आणि उरलेल्या तेलात कांदा, लाल मिरच्या आणि जीरे घालून परतावे.
- गरज वाटली तर कांदा परतताना १ चमचा तेल वाढवावे.
- चवीनुसार मीठ घालावे. थोडे मीठ घालून कांदा शिजू द्यावा.
- कांदा सोनेरी रंगाचा झाला की डिशमध्ये काढून थोडा थंड होऊ द्यावा.
- परतलेला कांदा, डाळी, चंचेचा कोळ व कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- थोडे कोमट पाणी घालून घट्टसर चटणी बनवावी.
- तयार आहे चटपटीत कांद्याची चटणी.
कांद्याची चटणी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला