चॉकलेट श्रीखंड
चॉकलेट श्रीखंड
चॉकलेट श्रीखंड करण्यासाठी लागणारा जिन्नस
- चक्का २ वाट्या
- साखर २ वाट्या
- वेलची पूड अगदी थोडी
- ड्रिकिंग चॉकलेट ४ टेबल स्पून
- व्हॅनीला इसेन्स २ थेंब
- पिठीसाखर २ टेबल स्पून
- चेरी व गुलाबपाकळी सजावटी करिता
चॉकलेट श्रीखंड करण्याची पाककृती
- चक्का व साखर मिसळून दहा मिनिटे पूरणयंत्रातून काढावे.
- त्यात वेलचीपूड घालून फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे.
- हे श्रीखंड दोन वेगवेगळ्या वाट्या किंवा बाऊलमध्ये भरून थंड करायला ठेवले तर सर्व्ह करताना सोपे जाईल.
- एका पॅनमध्ये ड्रिकिंग चॉकलेट व पिठीसाखर घालावी.
- अगदी थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करावे.
- मंद गॅसवर २ मिनिटे ठेऊन घट्टसर चॉकलेट सॉस करावा.
- प्रत्येक बाऊलमध्ये चॉकलेट सॉस चमच्याने पसरावा.
- वरून चेरी मध्यभागी ठेवून परत थंड करावे.
- सर्व्ह करताना गुलाबपाकळी पेरून द्यावे.
- नाविन्यपूर्ण चवीचे श्रीखंड चवदार लागते आणि लहान मुले तर आवडीने खातील.
चॉकलेट श्रीखंड
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला