पौष्टिक, चविष्ट आणि न्याहारीसाठी एक वेगळा पर्याय म्हणजे दडपे पोहे
दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटो, खोबरे, कोथिंबीर, पोहे यांसारखे पदार्थ कच्चे घातल्यामुळे हे दडपे पोहे खूपच पौष्टिक असतात.
दडपे पोहे करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या पातळ पोहे
- पाव वाटी किसलेले ओले खोबरे
- एक छोटा किसलेला किंवा चिरलेला कांदा
- एक चिरलेला टोमॅटो
- दोन हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- लिंबू
- पाव वाटी शेंगदाणे
- एक इंच आल्याचा तुकडा
दडपे पोहे करण्यासाठी लागणारा फोडणीचा जिन्नस
- दोन छोटे चमचे तेल
- ३ - ४ कडिपत्त्याची पाने
- पाव चमचा हळद
- छोटा चमचा मोहरी
दडपे पोहे करण्याची पाककृती
- सर्वप्रथम छोट्या कढईत फोडणी करुन त्यात हिरव्या मिरच्या, कडिपत्ता व शेंगदाणे टाका.
- तयार फोडणी कोरड्या पोह्यांवर वरुन टाका.
- पोहे व्यवस्थित हलवून घ्या.
- आता त्यात किसलेले ओले खोबरे, आले, किसलेला किंवा बारीक केलेला व चिरलेला टोमॅटो टाका.
- यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाका.
- लिंबू पिळून पोहे चांगले मिसळा
- फोडणी न देताही हे पोहे नुसते तेल व इतर साहित्य वरुन घालून करता येतात.
दडपे पोहे
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला