न्याहारीसाठी हलका फुलका स्वादिष्ट असा रवा मूगडाळ उपमा
गरमागरम उपम्यावर लिंबू पिळले असता उपम्याला एक वेगळीच चव येते.
रवा मूगडाळ उपमा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या साधा रवा
- पाऊण वाटी मुगाच्या डाळीचा रवा
- चार - पाच हिरव्या मिरच्या
- तीन छोटे कांदे
- एक छोटा चमचा साखर
- एक टोमॅटो
- पाच वाट्या गरम पाणी
- आवश्यकतेनुसार शेंगदाणे
- कोथिंबीर
- लिंबू
- चवीनुसार मीठ
रवा मूगडाळ उपमाच्या फोडणीसाठी लागणारा जिन्नस
- एक मोठा चमचा तेल
- अर्धा चमचा जीरे
- अर्धा चमचा मोहरी
- ४ - ५ कडिपत्याची पाने
रवा मूगडाळ उपमा करण्याची पाककृती
- मुगाची डाळ थोडीशी भाजून घेऊन बारीक वाटून रवा तयार करा.
- मुगाचा आणि साधा असा दोन्ही प्रकारचा रवा लालसर भाजून बाजूला ठेवा.
- यानंतर एका कढईत तेल टाकून शेंगदाणे तळून घेऊन बाजूला काढा.
- त्यानंतर तेलामध्ये फोडणीसाठी जीरे, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या आणि कांदा टाकून परता.
- कांदा लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका व चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्या.
- परतल्यावर यामध्य दोन्ही प्रकारचे रवे घालून पुन्हा चांगले परतून घ्या.
- व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालून झाकून वाफ येइपर्यंत ठेवा.
- गरमागरम उपमा कोथिंबीर घालून व लिंबू पिळून खायला द्या.
रवा मूगडाळ उपमा
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला