Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक २०३

मनाचे श्लोक - श्लोक २०३ - [Manache Shlok - Shlok 203] मना सर्वही संग सोडूनि द्यावा, अती आदरे सज्जनाचा धरावा.

मनाचे श्लोक २०३ | Manache Shlok 203

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २०३, मना सर्वही संग सोडूनि द्यावा, अती आदरे सज्जनाचा धरावा

मनाचे श्लोक २०३


मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।
अती आदरे सज्जनाचा धरावा ॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे ।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ २०३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः सर्वसंगं परित्यज्य दूराद्
विधेयः सदा सादरं साधुसङ्गः ।
महादुःखभङ्गः सतां संगमेन
विना साधनं तेन सन्मार्गलाभः ॥ २०३॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०३ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, हे मना, देहाचा आणि प्रपंचाचा संग सोडून दे.

समाधान बाणे त्यागितां संगासी ।
जनकें शुकासी सांगीतलें ।
सांगीतलें संग त्यक्त्वा सुखी भव ।
मग अनुभव शुक पाहे ॥

परंतु सज्जनांचा संग मात्र अवश्य धर.

समाधान घडे साधूचे संगतीं ।
गीताभागवतीं हें ची आहे ॥

कारण सत्समागमाच्या योगाने जन्ममरणाचे, संसाराचे दुःख नाहीसे होते व आयासावाचून पाऊल सन्मार्गावर पडते. महादुःख म्हणजे संसाराचेच दुःख कारण,

संसारदुःखा ऐसें दुःख ।
आणिक नाहीं ॥

म्हणून,

आलया रे संग साधूचा धरावा ।
संसार तरावा साधूसंगें ।


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची