खास लहान मुलांसाठी तसेच स्टार्टर म्हणून खाता येणारे चटपटीत मेथीचे गोळे
‘मेथीचे गोळे’साठी लागणारा जिन्नस
- १ मध्यम आकाराची मेथीची जुडी
- १ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
- ५-६ हिरव्या मिरच्या
- थोडी कोथिंबीर
- १/२ चमचा धणे कुटून
- मीठ
- हळद
- मोहनासाठी तेल
‘मेथीचे गोळे’ची पाककृती
- मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात.
- नंतर डाळीचे पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कुटलेले धणे, हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करुन पीठ भिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा.
- आता कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे ठेवून वाफवून घ्यावेत.
- गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतून घ्यावेत.
मेथी नसेल तर तुम्ही कसूरी मेथी वापरू शकता.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ