Loading ...
/* Dont copy */

पुरण पोळी - पाककृती

पुरण पोळी, पाककला - [Puran Poli, Recipe] पुरण पोळीची बनविण्याची आणखी एक सोप्पी पद्धत.

पुरण पोळी - पाककला | Puran Poli - Recipe

गोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला पुरण पोळी आवर्जून खाल्ली जाते.

‘पुरण पोळी’साठी लागणारा जिन्नस

  • १ किलो हरभऱ्याची डाळ
  • १ किलो उत्तम पिवळा गुळ
  • १०-१५ वेलदोड्यांची पूड
  • अर्ध्या जायफळाची व थोडी केशराची पूड
  • चवीसाठी १ चमचा मीठ
  • १ फुलपात्र बारीक रवा
  • १ फुलपात्र मैदा
  • २ फुलपाते चाळलेली कणीक
  • १ वाटी तेल व मीठ
  • लाटण्यासाठी तांदळाची पिठी.

‘पुरण पोळी’ची पाककृती

  • हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून शिजवून घ्यावी. नंतर चाळणीवर ओतून निथळावी.
  • नंतर त्यात चिरलेला गूळ घालून पुरण शिजवून घ्यावे. गूळ घातल्यानंतर सर्व मिश्रण पातळ होईल. पण जरा वेळाने पुनः घट्ट होईल. मिश्रण सतत हलत रहावे.
  • चांगले घट्ट झाले म्हणजे त्यात उलथने उभे करून पहावे. उलथने पडले नाही म्हणजे पुरण चांगले शिजले असे समजावे व उतरवावे.
  • नंतर गरम आहे तोवरच पुरणयंत्राला बारीक जाळी लावून त्यातून वाटून घ्यावे. त्यात चवीसाठी मीठ, केशर, वेलदोडे, जायफळ यांची पूड घालून बाजूला ठेवावे.
  • परातीत प्रथम रवा घ्यावा. त्यावर थोडे पाणी घालून ठेवावे. नंतर त्यात मैदा, कणिक, मीठ घालून पीठ भिजवावे. थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी.
  • पुरण पोळीची कणीक नेहमीच्या पोळ्याच्या कणकेपेक्षा थोडी सेल असते. नंतर कणकेच्या पारीत पुरण भरून उंडा तयार करावा.
  • हलक्या हाताने तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. लाटण्याला तेल लावून त्याला गुंडाळून अगर वर्तमानपत्रच्या चौपदरी घडीवर पोळपाट उलटा करून पोळी काढावी.
  • आजूबाजूची पिठी मऊ कपड्याने बाजूला करावी. पुरण पोळीच्या तापलेल्या तव्यावर दोन्हीकडून लालसर भाजावी व अर्धी घडी करून उलथन्याने पोळी अलगद खाली काढावी. तवा पुसुन घ्यावा. अशाच सर्व पोळ्या कराव्या.
  • गरमागरम पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत खाण्यास द्यावी.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची