पंजाबी स्वादाची आणि ग्रेव्ही युक्त मक्याची कोफ्ता करी
‘मक्याची कोफ्ता करी’साठी लागणारा जिन्नस
- ६ मक्याची कणसे
- १०० ग्रॅम बेसन
- १५० ग्रॅम बटाटे
- १/२ वाटी दही
- चिमूटभर सोडा
- १/२ चमचा मिरपूड
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा गरम मसाला
- १/२ चमचा तिखट
- ५ - ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
‘ग्रेव्ही’साठी लागणारा जिन्नस
- १ कांदा
- २ मोठे टोमॅटो
- ४-५ लसणीच्या पाकळ्या
- १ आल्याचा तुकडा
- १ चमचा गरम मसाला
- हळद
- मीठ
- तिखट
‘मक्याची कोफ्ता करी’ची पाककृती
- मक्याची कणसे किसून घ्यावी. नंतर तो किस कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्यावा.
- बटाटे उकडून, सोलून घ्यावेत. नंतर बेसन, दही, सोडा, मक्याचा कीस आणि बटाटे एकत्र करुन छोटे छोटे गोळे करावेत व तळून बाजूला ठेवावेत.
- जास्त तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेले आले व लसूण परतावा.
- नंतर हळद, तिखट व गरम मसाला घालून परतावे.
- पाण्याचा शिपका मारावा. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मीठ घालावे. जरा परतावे.
- बेताचे पाणी घालून रस दाटसर वाटाला की कोफ्ते घालून उतरावे.
- कोफ्ते घातल्यावर उकळू नये.
- वरुन कोथिंबीर घालून सजवावे आणि गरमागरम पोळी किंवा रोटीसोबत खाण्यास द्यावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ