उन्हाळ्यासाठी आंबट - गोड अशी ‘अननस थंडाई’
‘अननस थंडाई’साठी लागणारा जिन्नस
- १ वाटी अननसाचे चौकोनी तुकडे
- अडीच कप अननसाचे सरबत
- १०० ग्रॅम बदाम
- ३ मोठे चमचे खसखस
- ६ मोठे चमचे साखर
- बर्फाचा चुरा
‘अननस थंडाई’ची पाककृती
- खसखस दहा ते बारा तास आधी भिजवून ठेवावी.
- बदामाची साले काढून घ्यावी.
- ५० ग्रॅम बदाम व खसखस वाटून घ्यावी.
- उरलेल्या ५० ग्रॅम बदामाचे पातळ-जाड काप करून घ्यावे.
- वाटलेल्या मिश्रणात पाच ग्लास पाणी घालून ते गाळून घ्यावे.
- पाण्यात अननसाचे सरबत व साखर घालून हे मिक्सरमधून काढावे.
- त्यात अजून १ ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
- आयत्या वेळी अननसाचे तुकडे व बर्फाचा चुरा घालून अननस थंडाई पिण्यास घ्यावी.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ