सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ.
‘पुरणपोळी’साठी लागणारा जिन्नस
- १ किलो हरभर्याची डाळ
- १/२ किलो उत्तम पिवळा गुळ
- १/२ किलो साखर
- १०-१२ वेलदोड्यांची पुड
- थोडेसे केशर
- १/४ जायफळाची पूड
- १ फुलपात्र रवा
- १ फुलपात्र कणीक
- २ फुलपात्रे मैदा
- १ वाटी तेल
- मीठ
‘पुरणपोळी’ची पाककृती
- हरभर्याची डाळ स्वच्छ धुवुन शिजत घालावी. शिजतांना त्यात थोडे तेल व हळद घालावी. डाळ चांगली शिजली, की टोपलीत उपसून टाकावी. सर्व पाणी निथळले, की त्यात चिरलेला गूळ व साखर घालून शिजवावे, पुरण चांगले घट्ट शिजले पाहिजे.
- उलथणे पुरणात न पडता उभे राहिले, म्हणजे पुरण शिजले, असे समजावे.
- नंतर त्यात १/४ चमचा मीठ, जायफळ, वेलदोड्याची पूड व केशर घालावे. नंतर पुरणयंत्रावर किंवा पाट्यावर पुरण वाटावे.
- परातीत रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालावे व रवा भिजत ठेवावा, नंतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवावे.
- नंतर त्यात थोडे - थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी.
- पुरणपोळीची कणीक नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा सैलच असते.
- नंतर कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळ्या लाटाव्यात.
पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ