Loading ...

नवरत्न पुलाव - पाककृती

नवरत्न पुलाव, पाककला - [Navratna Pulao, Recipe] नऊ प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घालून बनवलेला पुलाव म्हणजे ‘नवरत्न पुलाव’ जो तुम्ही सणासुदीला तसेच पाहुणचार करण्यासाठी बनवू शकता.

नवरत्न पुलाव - पाककला | Navratna Pulao - Recipe

नऊ प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घालून बनवलेला ‘नवरत्न पुलाव’

‘नवरत्न पुलाव’साठी लागणारा जिन्नस

  • १॥ कप तांदुळ
  • १०० ग्रॅम फ्रेंचबीन
  • १०० ग्रॅम वाटाणे
  • १०० ग्रॅम गाजर
  • ३ कांदे
  • ४ टेबल स्पून तुप
  • अर्धा चमचा तिखट
  • छोटा अर्धा चमचा हळद
  • लसूण - आले पेस्ट
  • कोथिंबीर
  • १०० ग्रॅम पनीर
  • थोडा कोबी
  • थोडे काजु, बेदाणे
  • तळण्यासाठी तूप
  • मीठ

‘नवरत्न पुलाव’ची पाककृती

  • पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तळावे.
  • तांदळास वेगळे शिजवून घ्यावे.
  • भाजीचे छोटे छोटे तुकडे करून उकळावे.
  • एका भांड्यात तूप गरम करून बारीक चिरलेला कांदा परतावा.
  • नंतर त्यात आले - लसूण पेस्ट, पनीर, भाज्या, ड्रायफ्रुट्स टाकावे व त्यात हळद, तिखट टाकून मिक्स करावे.
  • भातामध्ये सर्व मिश्रण, मीठ टाकून एकत्र करावे व थोड वेळ गरम करुन त्यावर लिंबू पिळून वाढावे.
उरलेले तळलेले पनीर, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने वरून सजवावे.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची