सरसोची भाजी - सरसों का साग - पाककृती
सरसोची भाजी - सरसों का साग, पाककला - [Sarsochi Bhaji - Sarson Ka Saag, Recipe] ‘सरसोची भाजी - सरसों का साग’ ही पंजाबची पारंपारिक पाककृती असून खासकरुन थंडीच्या दिवसात आणि ते सुद्धा मक्याच्या रोटीसोबत खायला स्वादिष्ट लागते.
पंजाबची पारंपारिक पाककृती सरसोची भाजी - सरसों का साग
‘सरसोची भाजी - सरसों का साग’साठी लागणारा जिन्नस
- ५०० ग्रॅ. सरसो
- १५० ग्रॅ. पालक
- ५० ग्रॅ. पीठ
- २ लाल मिरच्या
- १ तुकडा कापलेले आले
- २ कापलेल्या हिरव्या मिरच्या
- १ कपलेला कांदा
- १/२ चमचा गरम मसाला
- ४ पाकळी लसूण
- १ चमचा लिंबाचा रस
- १/२ कप ताजे क्रीम
- ३ मोठे चमचे तूप
- चवीनुसार मीठ
‘सरसोची भाजी - सरसों का साग’ची पाककृती
- सरसो व पालक धुवून बारीक कापावे.
- २ कप पाण्याबरोबर कूकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
- गव्हाच्या पीठास थोड्या पाण्यात मिळवून मीठ, तिखट, गरम मसाला, आले आणि क्रीम मिळवावे.
- एक चमचा तुपात पीठाच्या मिश्रणास सोनेरी भाजून उतरवून घ्यावे.
- एका दुसर्या कढईत उरलेले तूप गरम करून जीरे, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या तोडुन टाकावी व फ्राय झाल्यावर पीठाच्या मिश्रणास मिळवावे.
- २ मिनीटानंतर सरसो व पालक टाकुन चांगल्या तर्हेने घोटावे.
- पाच - सात मिनीट शिजवून उतरवून घ्यावे वरून लोणी टाकावे आणि मक्याच्या चपातीबरोबर वाढावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.