काबुली चणे - पाककृती

काबुली चणे, पाककला - [Kabuli Chane, Recipe] हरभर्‍याचा एक प्रकार असलेला ‘काबुली चणे’ पासून बनवलेली खासकरुन उत्तर भारतातील प्रसिद्ध चमचमीत, मसालेदार अशी ही पंजाबी डिश भाताबरोबर किंवा रोटीबरोबर छान लागेल.
काबुली चणे - पाककला | Kabuli Chane - Recipe

चमचमीत, मसालेदार अशी पंजाबी डिश काबुली चणे

‘काबुली चणे’साठी लागणारा जिन्नस

 • ३ कप काबुली चणे
 • ३ मोठी विलायची
 • ४ छोटी विलायची
 • ४ लवंग
 • १ चमचा मीठ
 • १ तुकडे आले
 • १ चमचा खाण्याचा सोडा
 • १० कप पाणी

मसाल्यासाठी जिन्नस

 • ४ छोटे चमचे आमचूर
 • ४ चमचे गरम मसाला
 • २ चमचे काळी मिरी
 • १ चमचा मीठ
 • १ चमचे काळे मीठ
 • २ चमचे भाजून झालेले जीरे
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २५० ग्रॅम बटाटे
 • १ तुकडा आले
 • २ टोमॅटो

‘काबुली चणे’ची पाककृती

 • ३ कप चणे १० कप पाण्यामध्ये आले, मोठी विलायची, लवंग, दालचीनी, खायचा सोडा, मीठ टाकुन रात्रभर भिजू द्यावे.
 • सकाळी कुकरमध्ये १ शिटी होईपर्यंत उकडावे व काढुन कढईत टाकावे.
 • चण्याचे उकडलेले पाणीसुद्धा यात टाकून शिजवत ठेवावे.
 • चण्यावर सर्व वाटलेला मसाला पसरून द्यावा. तसेच थोडे पाणी टाकावे.
 • बटाट्याच्या चार चार तुकड्यांना चण्यावर सजवावे,
 • हिरवी मिरची उभी करून चण्यावर गरम तेल टाकावे तसेच वाढतांना लिंबू पिळावा व कोथिंबीरने सजवावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.