हॉट अँण्ड सॉर चिली सूप - पाककृती

हॉट अँण्ड सॉर चिली सूप, पाककला - [Hot And Sour Chilly Soup, Recipe] भूक वाढवणारे आणि थंडीत खासकरुन सर्दी झाल्यास उपयुक्त असे हॉट अँण्ड सॉर चिली सूप पिल्यास फायदा होईल.
हॉट अँण्ड सॉर चिली सूप - पाककला | Hot And Sour Chilly Soup - Recipe

भूक वाढवणारे चायनीज पद्धतीचे ‘हॉट अँण्ड सॉर चिली सूप’.

‘हॉट अँण्ड सॉर चिली सूप’साठी लागणारा जिन्नस

 • १ कप कोबी
 • १ कप गाजर
 • २ चमचे व्हिनेगर
 • २ चमचे कॉर्नफ्लावर
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • मीठ आवश्यकतेनुसार
 • १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
 • १ मोठा चमचा चिली सॉस
 • २ लहान चमचे तेल

‘हॉट अँण्ड सॉर चिली सूप’ची पाककृती

 • कोबी व गाजर बारीक चिरुन घ्या.
 • गॅसवर एक भांड ठेवून त्यामध्ये तेल व लाल मिरची पावडर टाका.
 • नंतर कोबी व गाजर टाकून परतून घ्या.
 • परतून झाल्यावर १ ग्लास पाणी टाकून हलवा.
 • उकळी आल्यावर चिली सॉस टाका. मीठ व काळी मिरी पावडर टाका.
 • थोड्याश्या पाण्यात कॉर्नफ्लावर टाकून ढवळून घ्या.
 • हे मिश्रण सूपमध्ये टाका व हालवत रहा. 
 • ५ मिनीटांनी गॅस बंद करा.
 • व्हिनेगर टाकून तळलेल्या न्युडल्ससोबत गरम गरम सूप वाढा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.