
कवयित्री प्रज्ञा वझे-घारपुरे यांची उन्हाळ्यातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन करणारीमाझ्या गुलाबी शहरातनिसर्ग कविता.
ऋतू गोडव्याचा उजाडे उन्हाळी स्मृती सोहळ्यांच्या गुलाबी आभाळी अशी सृष्टी सारी थटावी फुलांनी अन् मनाची कवाडे पुन्हा सज्ज व्हावी! नव्याच्या सुरांनी जुन्याची झळाळी दिसावी जणू की गुलाबी, लव्हाळी ऋतू गोडव्याचा उजाडे उन्हाळी इथे सोहळ्यांच्या गुलाबी आभाळी