निस्सीम - मराठी कविता

निस्सीम, मराठी कविता - कवी के तुषार यांची निस्सीम ही कविता.
ALT
निस्सीम (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
कवी के तुषार यांची निस्सीम ही कविता.

खोप्यातल्या पिलांना चोचितले ते दाने जात्यावरील ओवी, मातीमध्ये दिवाणे रानातल्या फुलांना, रानातले बहाणे मेनातल्या माईच्या, मेणावरील नाणे झाली थोतांड येथे, अन् ते कथा पुराणे कष्टाशिवाय ना चाले, कसलीच ते बहाणे मुंग्यापरीस वारूळ, अनुच्छेद जमिनींचे पाणी घश्यात आहे, त्या कोरड्या पापणींचे लटके अनेक वादे, फुसक्या बोगस बियांचे पोटातल्या किड्यांना, फुंकर भावनांचे लचका तोडून द्यावा, फुकट्या आश्वासनांचा मजले चढत गेला, विकास पावलांचा प्रशासने जळाली, दोरी गळ्यात टांगून रचल्या अनेक कहाण्या, गेल्या टीव्हीत सांगून

- के तुषार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.