खोपा (कविता)

कवी के तुषार यांची खोपा ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
खोपा - मराठी कविता
खोपा (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
कवी के तुषार यांची खोपा ही कवीता मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
कवी: के तुषार, आवाज: हर्षद खंदारे

खोप्या मधील खोपा अजुनी तसाच आहे भात्या मधील विस्तव मन खुशाल जाळत आहे झाडां मधील झोका एकटाच बांधलेला तुटला किती रूपाने परिवार सावल्यांचा अस्ती कुणास ठाऊक नुसते नदी किनारे शोधून जोडले मी पोटावरील गाणे पाठीवरील ओझे साठीतल्या वयाचे जळते मशाल हाती ते भाव अत्तराचे खुलते कळी नव्याने ते घाव अंतरीचे जपते फुलांप्रमाने ते शील कस्तुरीचे

- के तुषार

1 टिप्पणी

  1. अत्यंत सुंदर आहे सर ही कविता
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.