दे ना मला दुलई तुझी, गोड-गोजिऱ्या धुक्याची, पांघरूनी मग मी ही निजेन
दे ना मला दुलई तुझी
गोड-गोजिऱ्या धुक्याची
पांघरूनी मग मी ही निजेन
स्वप्नं कोवळ्या उन्हाची
दे ना मला...
स्वप्नं सोनेरी, उदयाची
आभाळासंगती उडण्याची
दे ना मला आस रे तुझ्या
जर्द हिरव्या पिसाऱ्याची
दे ना मला...
पिसारा तुझा मखमली
वर दुलई हिमसावली
शुभ्र गारठा हिरवाळुनीया
दे ना चाहूल त्या निळ्याची
दे ना मला...