ओसाड ह्या शेतामधली - मराठी गझल

ओसाड ह्या शेतामधली, मराठी गझल - [Osad Hya Shetamadhali, Marathi Ghazal] ओसाड ह्या शेतामधली गेली करपून हिरवळ, पिंपळाला या नाही पान गेली हरपून सळसळ.
ओसाड ह्या शेतामधली - मराठी गझल | Osad Hya Shetamadhali - Marathi Ghazal

ओसाड ह्या शेतामधली गेली करपून हिरवळ, पिंपळाला या नाही पान गेली हरपून सळसळ

ओसाड ह्या शेतामधली गेली करपून हिरवळ
पिंपळाला या नाही पान गेली हरपून सळसळ

पाखरांचे या थवे धावती तहान घेऊन सोबतीला
झुळझुळ होता झरा बिचारा गेली आटून खळखळ

हात मोडले हातपंपाचे मूक झाल्या या नद्या
पाण्यापायी वेळ ही आली धारा डोळ्यातून ढळढळ

पाणी पिउनी मंत्री बोलती हातात त्यांच्या बिसलरी
उपाय संपले सरकारचे आता काय उपयोग करुन वळवळ

टिकत नाही झाड कुठले जंगल बाभळीचे
घुसला काटा जहरीला आता रक्त वाहे भळभळ
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.