पानातून वाजे वारा हळूवार सुरेल, दूर दूर ही धून दिशांदिशात उरेल
पानातून वाजे वारा हळूवार सुरेलदूर दूर ही धून दिशांदिशात उरेल
कोवळे हे उन्हं वाढते झाडावरी हळू
सुगंध सारा पाकळ्यातूनी फुलाफुलांत बहरेल
बिलगून चांदणे पालवीला भेटेल मुक्याने
भाबडा काठ नदीचा होऊनी आतूर झुरेल
जित ही माझी बोचते काट्यापरी जीवाला
जिंकलेले डाव माझे मी पुन्हा हरेल
स्वप्नास माझ्या पाहती खोल बुडवावयास लोक
होऊनी गाथा तुक्याची ते पाण्यावरी तरेल