मी मलाच कधी कधी - मराठी गझल

मी मलाच कधी कधी, मराठी गझल - [Me Malach Kadhi Kadhi, Marathi Ghazal] मी मलाच कधी कधी शोधित राहतो, अन् मनाच्या मातीस एकटयाने खोदित राहतो.
मी मलाच कधी कधी - मराठी गझल | Me Malach Kadhi Kadhi - Marathi Ghazal

मी मलाच कधी कधी शोधित राहतो, अन् मनाच्या मातीस एकटयाने खोदित राहतो

मी मलाच कधी कधी शोधित राहतो
अन् मनाच्या मातीस एकटयाने खोदित राहतो

सुटतो तालात तोल रस्त्यावरी जेव्हा
माझ्याच पावलांना मी पुन्हा बांधित राहतो

गेलीस जरी उधळूनी मी दिलेली सारी फुले
एक एक फुल मी आता वेचित राहतो

बुडतो हळूच चंद्र अन् विझतात साऱ्या चांदण्या
स्वप्नात सावल्याना मी मग ओढीत राहतो

घेऊनी पुढ्यात आयुष्य सारे हारलेले
अवशेष स्वप्नांचे मी मग जोडीत राहतो
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.