माणुसकीचा आज इथे झाला आता अंत, कुणी नाही साधू इथे कुणी नसे संत
माणुसकीचा आज इथे झाला आता अंतकुणी नाही साधू इथे कुणी नसे संत
कोपऱ्यात बसली आज सत्य आणि अहिंसा
झाकूनिया डोळे आपले देव पाहे अंत
आपसातील भांडणे ही स्वार्थ सारा माजला
गेला कुठे देश आपुला कुणा नसे खंत
व्याकूळ होऊनी भूकेने फिरतो आम्ही इथे-तिथे
अन् जेवूनी तुमचे खुशाल चालू असे खंत
पहा कसे तुमचे वेगवान रस्ते बेईमानीचे
मार्ग आमुचा माणुसकीचा आहे जरा संथ