सांगू कसे शब्दात सारे - मराठी गझल

सांगू कसे शब्दात सारे, मराठी गझल - [Sangu Kase Shabdat Sare, Marathi Ghazal] काळजातील भावनांच्या उद्रेकावर घातले मी पांघरुन, घायाळ होउनी पडलो इथेच मी.
सांगू कसे शब्दात सारे - मराठी गझल | Sangu Kase Shabdat Sare - Marathi Ghazal

काळजातील भावनांच्या उद्रेकावर घातले मी पांघरुन, घायाळ होउनी पडलो इथेच मी पंख माझे पसरुन

काळजातील भावनांच्या उद्रेकावर घातले मी पांघरुन
घायाळ होउनी पडलो इथेच मी पंख माझे पसरुन

सांगू कसे शब्दात सारे भाव माझ्या मनातले
शिंपलेल्या चांदण्या आभाळी घे तू ओळखून

भासले फुलापरी मजला शब्द तुझे चांदण्याचे
तेंव्हा शब्दातल्या सुगंधाने गेलो मी बहरुन

उठते अजूनही काहूर मनात माझ्या कधी तरी
गर्दीत भावनांच्या बसतो मी स्वतःला हरवून

जातो मनात मी माझ्याच मृत्यूच्या पाशी
माझेच थडगे मग मी काढतो उकरुन
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.