जेथे जातो तेथे पाहतो मी माणसे जळकटलेली, जिथे तिथे माणसांची मने ही मळकटलेली
जेथे जातो तेथे पाहतो मी माणसे जळकटलेलीजिथे तिथे माणसांची मने ही मळकटलेली
मोकाट माणसे जेव्हा जाणती भावना परस्परांच्या
बुध्दीवादी माणसे तेव्हाच दिसती भरकटलेली
पेटलेल्या रानी निवांत कशी दिसतात माणसे
लाऊनी दारे मनाची धुरामध्ये धुरकटलेली
शुध्दता ही जगातली राहीली शुध्द कुठे आता
भेसळीच्या सागरात ती ही कळकटलेली
मोठमोठया माणसाची वलये दिसती मोठमोठी
पाहतो जी माणसे ती विचाराने बुरसटलेली