असे कोणते पान आहे ज्यावरी त्याचा लेख नाही, जो पोसतो जगाला त्याचा कुठेच उल्लेख नाही
असे कोणते पान आहे ज्यावरी त्याचा लेख नाहीजो पोसतो जगाला त्याचा कुठेच उल्लेख नाही
मातीत शोधतो पुन्हा खोल अस्तित्व नांगराचा फाळ
संसार चालवूनी जगाचा कुठेच त्याची ढेक नाही
आड येते अज्ञान सदा भोवताली अंधार थांबलेला
उखडूनी पाउल टाक पुढे ही काही ग्यानबाची मेख नाही
कष्टात वाहती नद्या मिळती कर्जातल्या सागराला
सावकार घालिती फेऱ्या इमान त्यांचे नेक नाही
स्तंभावरी फास सदा अन रेषेत दाटले दारिद्रय
कष्टकऱ्याच्या वेदनेचा कुठेच कसा आलेख नाही