
आर समिर यांची मास्क मुक्ति झाल्यामुळे रुसलेल्या मास्कचीरुसलेला मास्कही गमतीशीर बालकविता.
काल पासून मास्क माझा कोपऱ्यात रुसून बसला आहे झालं तुमचं आता मला कोण ओळखणार म्हणत आहे म्हणतो कसा गाल फुगवून कामा पुरता वापर केला भले हसणे लपले माझ्यामुळे श्वास कोंडला माझ्या मुळे पण जीव तर तुमचा मीच वाचवला भले असो मी रूमालाचा वा असो कापडाचा नाही तर असो सर्जिकलचा आजही मी तसाच आहे पुढेही मीच उपयोगाला येणार आहे शेवटी निर्णय आहे तुमचा तोंड तुमचं असलं तरी आजार नाही कोणाचा गरीब असो वा श्रीमंत आजाराला नाही कळतं तुम्हीच आता ठरावयचं आहे मला कोपऱ्यात का पुन्हा तोंडावर ठेवायचं आहे