पेरूची कोशिंबीर - पाककृती

पेरूची कोशिंबीर, पाककला - [Peruchi Koshimbir, Recipe] उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी जेवणात आवर्जुन खाता येईल अशी तसेच उपवासालाही चालणारी चटपटीत ‘पेरूची कोथिंबीर’ नक्की करून पहा.
पेरूची कोशिंबीर - पाककला | Peruchi Koshimbir - Recipe

थंडावा देणारी आणि उपवासाला चालणारी चटपटीत पेरूची कोशिंबीर

‘पेरूची कोशिंबीर’साठी लागणारा जिन्नस

 • ३-४ मोठे दळदार पिकलेले पेरू
 • ३-४ मध्यम बटाटे
 • २-३ पातीसह कांदे
 • ३ हिरव्या मिरच्या
 • ४-५ कोथिंबिरीच्या काड्या
 • ४-५ पुदिनाच्या काड्या
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा साखर

‘पेरूची कोशिंबीर’ची पाककृती

 • बटाटे उकडून सोलावे, बटाटे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी.
 • पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिरावा.
 • सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी.
 • लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी.

उपवासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.