जिभेला चव आणणारी ‘गुजराती कढी’
‘गुजराती कढी’साठी लागणारा जिन्नस
- ८ - १० वाट्या बेताचे आंबट ताक
- ५ - ६ छोट्या लाल मिरच्या
- आल्याचा तुकडा
- २ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन)
- मीठ
- थोडासा गूळ
- २ - ३ लवंगा
- १ दालचिनीचा तुकडा
- १/२ चमचा मोहरी
‘गुजराती कढी’ची पाककृती
- मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत.
- डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे.
- गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कडिपत्ता व कोथिंबीर टाकावी.
- नंतर हिंग, जीरे व ५ - ६ छोट्या लाल मिरच्या घालून वरून तुपाची फोडणी द्यावी.
- एक उकळी काढून गॅस बंद करावा. तयार आहे गुजराती कढी.
जीरा राईस किंवा खिचडीसोबत गुजराती कढी छान लागते.
ही कढी थोडी दाट असते. हळद घालू नये.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ