तिळाचे लाडू - पाककृती

तिळाचे लाडू, पाककला - [Tilache Ladoo, Recipe] थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा देण्याचे काम ‘तीळ’ करतात. अशा पोषक आणि खमंग तिळाचा रूचकर पदार्थ म्हणजे ‘तिळाचे लाडू’ खास मकरसंक्रांतीसाठी बनवले जातात. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच खाता येईल असे मऊ तिळाचे लाडू घरी करुन पहा.
तिळाचे लाडू - पाककला | Tilache Ladoo - Recipe

पोषक, मऊ आणि खमंग असे तिळाचे लाडू

‘तिळाचे लाडू’साठी लागणारा जिन्नस

  • २५० ग्रॅम तीळ
  • ५०० ग्रॅम खवा
  • ५०० ग्रॅम पिठी साखर
  • अर्धा चमचा वेलची पावडर

‘तिळाचे लाडू’ची पाककृती

  • तीळ साफ करून कढईत भाजा.
  • हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.
  • हलक्या हाताने कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  • कढईत खवा भाजून घ्या.
  • थंड झाल्यावर त्यात पिठी साखर, कुटलेले तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.