चॉकलेट केक - पाककृती

चॉकलेट केक, पाककला - [Chocolate Cake, Recipe] लहान मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट केक’ साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येईल.
चॉकलेट केक - पाककला | Chocolate Cake - Recipe

‘चॉकलेट केक’ थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर ने आइसिंग करुन स्वाद वाढतो.

‘चॉकलेट केक’साठी लागणारा जिन्नस

 • दीड कप मैदा
 • अर्धा कप कोको पावडर
 • एक कप पीठी साखर
 • २ अंडी
 • १/२ चमचा खायचा सोडा
 • १ कप ताजे दही
 • अर्धा कप वितळलेले लोणी
 • एक लहान चमचा व्हॅनिला इसेंस

‘चॉकलेट केक’ची पाककृती

 • मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा.
 • लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा.
 • आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा.
 • आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा.
 • मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर ३० मिनीटे बेक करा.
 • केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर ने आइसिंग करा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.