बटर आइसिंग - पाककृती

बटर आइसिंग, पाककला - [Butter Icing, Recipe] केक बनविल्यानंतर महत्वाचे असते ते म्हणजे केक सजावटीसाठी ‘बटर आयसिंग’, ज्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकुन केकची चव वाढवता येईल.
बटर आइसिंग - पाककला | Butter Icing - Recipe

केक सजावटीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ‘बटर आइसिंग’

‘बटर आइसिंग’साठी लागणारा जिन्नस

  • १ कप लोणी
  • पाऊण कप आइसिंग शुगर
  • १ लहान चमचा व्हॅनिला एसेंस

‘बटर आइसिंग’ची पाककृती

  • एका भांड्यात लोणी घेऊन चांगले फेटा.
  • चांगले फेटुन झाल्यावर त्यामध्ये आयसिंग साखर व एसेंस मिसळून पुन्हा मऊ होईपर्यंत फेटा.
  • तयार आहे आपले बटर आयसिंग.
बटर आयसिंग केक वर लावावे.

केक मधून कापून त्यावर बटर आयसिंग करता येते.

केकच्या वरून सजावटीला पण हे आइसिंग उपयोगी आहे.

आइसिंगला नोजलमध्ये भरून केकवरती सजावट करावी किंवा प्लास्टिक थैलीचा कोन करून त्यात भरून सजावट करावी.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.