चण्याचे गोळे - पाककृती

चण्याचे गोळे, पाककला - [Chanyache Gole, Recipe] चणाडाळ व उडीद डाळीचे गोळे करुन उन्हात कडक वाळल्यानंतर तयार चण्याच्या गोळ्याची सुंदरशी आमटी बनवता येते.
चण्याचे गोळे - पाककला | Chanyache Gole - Recipe

आमटीसाठी चटपटीत ‘चण्याचे गोळे’

‘चण्याचे गोळे’साठी लागणारा जिन्नस

 • २५० ग्रॅम चणाडाळ
 • २५० ग्रॅम उडीद डाळ
 • १ टी. स्पून धणे - जिरे पावडर
 • १ टी. स्पून हिंग
 • १ टी. स्पून लसूण पेस्ट
 • २ टी. स्पून मिरची पेस्ट
 • २ टी. स्पून प्रत्येकी पुदिना व कोथिंबीर पेस्ट
 • २ टी. स्पून मीठ.

‘चण्याचे गोळे’ची पाककृती

 • चणाडाळ व उडीद डाळ रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये जाडसर वाटाव्या. (एकदम बारीक करू नयेत.)
 • त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले एकत्र करून गोळा बनवा.
 • कडक उन्हात प्लॅस्टिकवर त्या मोठ्या गोळ्याचे बारीक बारीक गोळे करून वाळत घालावेत.
 • कडकडीत सुकल्यावर घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवा.
आवश्यकतेप्रमाणे आमटीत घालून चण्याच्या गोळ्यांची आमटी बनवा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.