राजमा मसाला - पाककृती

राजमा मसाला, पाककला - [Rajma Masala, Recipe] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी ‘राजमा मसाला’ पंजाबी डिश भाताबरोबर छान लागते.
राजमा मसाला - पाककला | Rajma Masala - Recipe

प्रसिद्ध पंजाबी डिश राजमा मसाला

‘राजमा मसाला’साठी लागणारा जिन्नस

 • ५०० ग्रॅम राजमा
 • १ कप ताजे दही
 • ३ कांदे
 • ३ इंच आले
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा धणे पावडर
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा तिखट
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • २ चमचे क्रीम
 • तीन चमचे तेल
 • मीठ
 • कोथिंबीर

‘राजमा मसाला’ची पाककृती

 • राजमा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात चिमूटभर सोडा मिसळा.
 • याच पाण्यात सकाळी राजमा उकळा. नंतर पाणी काढून टाका.
 • पातेल्यात तूप गरम करा. त्यात आले. कांदा, हिरवी मिरची, धणे पावडर टाकून परता.
 • परतल्यावर त्यात दही आणि राजमा टाका.
 • चवीनुसार मीठ टाकून थोडा वेळ भाजा नंतर पाणी टाकून शिजवा.
 • एक - दोन उकळ्या आल्यावर गरम मसाला व क्रीम टाका.
 • शिजल्यावर कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.