रिच पुडिंग - पाककृती
रिच पुडिंग, पाककला - [Rich Pudding, Recipe] ब्रेड, अंडे, सुका मेवा, द्राक्षे घालून तयार केलेले ‘रिच पुडिंग’ डेझर्ट म्हणुन मुलांना खायला देता येईल.
खास मुलांसाठी गोड पदार्थ रिच पुडिंग
‘रिच पुडिंग’साठी लागणारा जिन्नस
- ६-७ ब्रेडचे स्लाईसेस
- १ वाटी साखर
- २ टेबल स्पून काजू - अक्रोडचे बारीक काप
- ८ - १० सिडलेस द्राक्षे
- ८ - १० चेरी
- २ टेबल स्पू्न टुटी फ्रुटी
- २ वाटी दूध
- २ वाटी ताजी साय
- ४ अंडी
- १ टी स्पू्न लवंग, दालचिनी, जायफळची मिक्स पूड
- व्हॅनिला इसेन्स
‘रिच पुडिंग’ची पाककृती
- अंड्याचा पांढरा भाग व साखर एकत्र फेटावे. पिवळा भाग वेगळा फेटावा.
- ब्रेडचा चुरा करावा. दूध गरम करावे.
- ब्रेडचा चुरा, सर्व फ्रुट्स, मिक्स पूड, व्हॅनिला इसेन्स, फेटलेले अंड्याचे मिश्रण, साय हे सर्व मिश्रण चांगले ढवळून सारखे करुन ग्रीस केलेल्या पुडिंग मोल्डमध्ये ओतून घ्यावे.
- वरुन चेरी व टुटी फ्रुटी पसरवून ओव्हनमध्ये १८० डिग्री वर बेक करावे, २५ - ३० मिनिटात पुडिंग तयार होते.
- तयार रिच पुडिंग सर्व्ह करताना द्राक्षे व चेरी टाकून सर्व्ह करावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.